संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

‘ते’ लालबागचा राजाही गुजरातला नेतील; संजय राऊत यांची अमित शहांवर टीका

गुजरातला उद्योगधंदे पळविणारे लालबाग राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येत आहेत. यांच्या मनात आले तर लालबागचा राजा गुजरातला नेतील, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.

Swapnil S

मुंबई : गुजरातला उद्योगधंदे पळविणारे लालबाग राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येत आहेत. यांच्या मनात आले तर लालबागचा राजा गुजरातला नेतील, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.

अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्याची परवानगीची गरज नाही. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येतायेत, येऊद्यात. पण मला सारखी भीती वाटते की, ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना. शहा काहीही करू शकतात, अशा शब्दांत राऊत यांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या डोक्यात काय चालते हे देवेंद्र फडणवीस यांना खरेच कळले असते तर देवेंद्र फडणवीस यांची अवस्था बिकट झाली नसती. फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का, अशी टीका राऊत यांनी केली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली