चंद्रशेखर बावनकुळे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

घर बांधणाऱ्यांना ५ ब्रास मोफत वाळू मिळणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

घरकुल बांधणाऱ्यांसाठी आता मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. घर बांधणाऱ्यांना आता पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : घरकुल बांधणाऱ्यांसाठी आता मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. घर बांधणाऱ्यांना आता पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे. “ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.

“एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असे वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टो क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही - बावनकुळे

एकनाथ शिंदे हे काँग्रेसच्या वाटेवर होते, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर बावनकुळे म्हणाले की, “या राज्यात विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत. संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचे काही लक्ष नाही, माझेही लक्ष नाही. त्यामुळे आमच्यासमोर आता पॉलिटिकल प्रश्नांची, राजकीय सरबत्तीची प्रायोरिटी नाही. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला आमचे सरकार कसे न्याय देईल? जनतेला दिलेला संकल्प आम्ही पूर्ण कसा करू? याकडे आमचे लक्ष आहे.”

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव