महाराष्ट्र

पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी

२ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी केली प्रवेशपूर्व नाव नोंदणी : विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ४९५ अर्ज

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आज (ता. १३) रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांद्वारे जाहीर केली जाणार आहे. २५ मे पासून सुरु झालेल्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत.

विद्यापीठाने निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार व प्रचलित नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबवली जाणार आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये बीकॉम १,८८,३९०, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) ४१,०५१, बीकॉम (अकाऊंट एँड फायनान्स) १,११,८१२, बीए ६०,८२६, बीएस्सी आयटी १,०४,९८४, बीएस्सी ४१,२९२, बीएस्सी कम्प्युटर सायन्स ६६,१८७, बीएएमएमसी (स्वायत्त) २५,६४०, बीकॉम (बँकींग अँड इन्शूरंस) (स्वायत्त) १२,९५२, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) (स्वायत्त) २५,१२३, बीएस्सी (बायोटेक्नोलॉजी) (स्वायत्त) १८,९५३, बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ई-कॉमर्स) (स्वायत्त) १४, ८६१ यासह विविध अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व राज्य सरकारच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमीत केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार,

आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेसाठी सर्वाधिक अर्ज

विद्याशाखानिहाय सादर केलेल्या प्रवेश अर्जांमध्ये सर्वाधिक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ४ लाख ७५ हजार ७९ एवढे अर्ज असून, विज्ञान विद्याशाखेसाठी २ लाख ९२ हजार ६०० अर्ज, मानव्यविज्ञान शाखेसाठी १ लाख २ हजार ८२५ एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक