महाराष्ट्र

ओझर्डे, सडावाघापूर येथे उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी; परिसर हाऊसफुल्ल

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे कोयनानगर परिसराने हिरवा शालू परिधान केला आहे. कोयनेचे पावसाळी पर्यटन चांगलेच बहरू लागल्याने वीकेंड व पावसाळी पर्यटणामुळे कोयनानगर येथे निसर्ग पर्यटनाचा मनमुरादपणे आस्वाद घेण्यासाठी पर्यकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे.

Swapnil S

कराड : पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे कोयनानगर परिसराने हिरवा शालू परिधान केला आहे. कोयनेचे पावसाळी पर्यटन चांगलेच बहरू लागल्याने वीकेंड व पावसाळी पर्यटणामुळे कोयनानगर येथे निसर्ग पर्यटनाचा मनमुरादपणे आस्वाद घेण्यासाठी पर्यकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. कोयना धरण, नेहरू उद्यान व नवजा येथील ओझर्डे धबधबा आणि सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी परराज्यातील पर्यटकांची तालुक्यात प्रचंड गर्दी होत आहे. पावसात तसेच छोट्या-छोट्या धबधब्याखाली ओलेचिंब होऊन वर्षाविहाराचा आनंद पर्यटक घेत आहेत.

निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केल्याने निसर्गाची खाण म्हणून पाटण तालुक्याची सर्वत्र ओळख आहे. काठी येथील केटु पॉईंट, ढेबेवाडी येथील फुलपाखरू उद्यान, तारळेतील तारळी धरण, चाफळमधील राममंदीर, धारेश्‍वर दिवशी येथील धबधबा, भारसाखळे येथील धबधबा, रामघळ, सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा, धुक्यात हरवलेला पवनचक्की प्रकल्प इत्यादी ठिकाणीदेखील पर्यटकांनी मोठी गर्दी होत आहे. शिवाय कोयना परिसरातील पर्यटनही चांगले बहरले आहे. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरून फेसाळत वाहणारे छोटे-मोठे धबधबे, कोयना धरणाचा धरणाचा विस्तीर्ण पसरलेला अथांग छत्रपती शिवाजी महाराज जलाशय, घाटमाथा परिसर, डोंगर कपारीतून खळखळून वाहणारे धबधबे, आजूबाजूच्या सभोवतालची हिरवीगार वनराई, हिरव्यागार रानात चरणारी गुरे, जागो जागी भातखासरात चाललेली लावणी असे विहंगम चित्र डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटकांनी कोयना परिसरात प्रचंड गर्दी केली आहे.

हुल्लडबाजांवर कारवाईची मागणी

पर्यटनस्थळी आनंद लुटण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्दापर्यंत सर्वच या ठिकाणी येत आहेत. यात सर्वाधिक तरुणाईची संख्या जास्त आहे. अनेक तरुण हे मद्यप्राशन करून धबधबा परिसरात आरडाओरडा करत धिंगाणा घालतात. अनेक वेळा इतर पर्यटकांबरोबर त्यांची बाचाबाचीही होते. या सर्वांचा त्रास हा महिला व वृद्ध पर्यटकांना होत आहे. त्यामुळे अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

कणीस, कांदा-भजी, गरमागरम चहा

शनिवारी व रविवारी वीकेंडसह पावसाळी पर्यटनाला कोयनानगर येथील निसर्ग डोळ्यात सामावून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढूच लागली आहे. परिसराने धुक्याची झालर व हिरवा शालू परिधान केलेला आहे. कधी संथ तर कधी मुसळधार पावसाने येथे येणारे पर्यटक ओलेचिंब होत परिसराचा आनंद घेत आहेत. परिसराने हिरवा शालू परिधान केल्याने कोयनेचा निसर्ग पर्यटक मोबाईलमध्ये टिपत आहेत. लहाग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत येथे गर्दी होत आहे. अगदी सकाळपासूनच निसर्ग पर्यटनासाठी गर्दी होत असल्याने येथील व्यवसायही वाढला आहे. मक्याचे कणीस, कांदा भजी, स्वीर्ट कॉन चहाचा आस्वाद पर्यटन घेत आहेत. यानिमित्ताने स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

व्याजदर यंदाही स्थिरच; एल निनो, युद्धामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला महागाईची धास्ती

'ते' पत्र अखेर वाहन संघटनेकडून मागे; E20 इंधनाबाबतची आकडेवारीत स्पष्टता हवी!

माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांच्या तोंडाला काळे फासू; राष्ट्रवादीचा काँग्रेसला गंभीर इशारा

Mumbai-Goa Highway : गणपतीत यंदाही वाहतूक कोंडीचे 'विघ्न'! माणगाव बाह्यवळण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

एलपीजी सिलिंडर होणार महाग?