प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मावळमध्ये तिहेरी हत्याकांड! गर्भपातादरम्यान विवाहित प्रेयसीचा मृत्यू, मृत महिलेसह दोन चिमुकल्यांना पाण्यात फेकले

विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांना तिच्याच प्रियकराने मित्राच्या मदतीने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मावळ येथे घडली आहे.

Swapnil S

पुणे : विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांना तिच्याच प्रियकराने मित्राच्या मदतीने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत महिलेच्या वडिलांनी सोमवारी (दि.२२) फिर्याद दिली. या घटनेत २५ वर्षीय विवाहित महिला, ५ वर्ष व २ वर्ष वयाची मुले या तिघांची हत्या झाली आहे. याप्रकरणी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर, रविकांत गायकवाड, गर्भपात करणारी एजंट महिला, कळंबोलीमधील संबंधित डॉक्टर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने इंदोरी हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

मृत महिला घरी न परतल्यामुळे ती हरवली असल्याची फिर्याद तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. या संदर्भात तपास करत असताना पोलिसांना महिला प्रियकर गजेंद्र आणि त्याच्या मित्रासोबत फोनवर वारंवार संभाषण करत होती हे समोर आले. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्हाची कबुली दिली.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

आता एका क्लिकवर मिळणार सरकारी पुस्तके; राज्य शासनाचे ऑनलाइन पोर्टल लवकरच सुरू

Mumbai : मीरा-भाईंंदरकरांनो, पाणी जपून वापरा; १ जुलैपासून २४ ते ४८ तास पाणी पुरवठा बंद

मोहरम मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध नाही; मुंबई पोलिसांचा खुलासा