तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार

खरिपाच्या डाळींच्या उत्पादनावर दुष्काळाचा फार मोठा परिणाम झाला आहे. नवीन तुरीचे उत्पादन घटल्याने आवकवर परिणाम झाला आहे. परिणामी, मागील १५ दिवसांत तूरडाळ १४ ते १६ रुपयांनी महागली असून ती १३२ ते १३४ रुपये किलोने विकली जात आहे.

प्रतिनिधी

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

खरिपाच्या डाळींच्या उत्पादनावर दुष्काळाचा फार मोठा परिणाम झाला आहे. नवीन तुरीचे उत्पादन घटल्याने आवकवर परिणाम झाला आहे. परिणामी, मागील १५ दिवसांत तूरडाळ १४ ते १६ रुपयांनी महागली असून ती १३२ ते १३४ रुपये किलोने विकली जात आहे.

आगामी दसरा आणि दिवाळी सणांमुळे बाजारात मिठाई, फरसाण व बेसनासाठी हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. पुरवठा कमी असल्याने किलोमागे १० रुपयांनी भाव वाढले असून हरभरा डाळ ९० ते ९४ रुपये किलोने विक्री होत आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिली आणि तेव्हाच मुगाच्या पेरणीत मोठी घट झाली. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. त्यामुळे मूगडाळ ८ रुपयांनी भडकून ती ११० ते ११२ रुपये किलोवर पोहोचली आहे.

बार्शी ज्वारी किलोमागे १० रुपयांनी महागली असून ती ६७ ते ७० रुपये किलोने विकली जात आहे. शाळू ज्वारीचा दर प्रति किलो ४५ ते ६० रुपये झाला आहे. नवीन ज्वारीसाठी पुढील वर्षी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. देशांतर्गत टंचाई भरून काढण्यासाठी म्यानमार आणि आफ्रिकन देशांमधून तूर आयात केली जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचे दर वाढल्याने आयातही महाग पडत आहे. ऐन दसरा, दिवाळी सण तोंडावर आलेला असतांना धान्य बाजारालाही आता दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. डाळी, तांदूळ, ज्वारी आणि गव्हाच्या दरात १५% वाढ झाली असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महिन्याचे किराणा बजेट वाढले आहे. त्यातच दिवाळीच्या तोंडावर आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

जुना मोंढा बाजारातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, तूर डाळीच्या घाऊक दरात किलोमागे सुमारे १० रुपयांची वाढ झाली असून, ती आता १३० रुपये किलोवर पोहोचली आहे. हरभरा डाळीचे दरही १० रुपयांनी वाढून ९० रुपये किलो झाले आहेत. मूग डाळीत सहा रुपयांची वाढ झाली असून, ती १०५ ते ११० रुपये किलो आहे. उडीद डाळीचे दर पाच रुपयांनी वाढून १२५ ते १४० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

ज्वारी ७५ रुपयांवर

अत्यल्प पावसाचा सर्वाधिक परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्वारीच्या घाऊक दरात किलोमागे किमान १० रुपयांची वाढ झाली असून, दर आता ५० ते ७५ रुपये किलोवर पोहोचला आहे. गव्हाच्या दरातही दोन ते तीन रुपयांची वाढ झाली असून, गहू ३२ ते ४० रुपये किलोवर आहे. मात्र बाजरीचे दर ३२ ते ३५ रुपये किलोवर स्थिर आहेत.

‘दुष्काळी स्थितीमुळेच डाळी, तांदूळ, गहू आणि ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही’.
सुनील कांकरिया, किराणा व्यावसायिक, जुना मोंढा
दादा दुष्काळ पडला आहे. आता खायला अन्न नाही. रेशनचे धान्य वेळेत मिळत नाही. गरीबाचा जीव टांगणीला लागला आहे. लेकराचे शिक्षण करावं म्हणतो पण पीक हातचं डोळ्या समोर करपून गेलं आहे. काय करावं कळत नाही.
सुनंदा जगन मोरे, गृहिणी

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय

MPSC च्या आजी-माजी अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी; मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्यपालांना शिफारस

हरदीप पुरी, स्मृती इराणी यांचे पत्ते कट; उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी भाजपचे आठ उमेदवार जाहीर

'इंडिगो'चा प्रवास महागला; देशांतर्गत किमान ३७५, तर कमाल १३०० रुपयांची भाडेवाढ

मेंदूच्या कार्यावर संशोधन : तीन शास्त्रज्ञांना नोबेल; जर्मनी-अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील बहुमान