राधानगरीत दोन नर वाघ; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सकारात्मक संकेत 
महाराष्ट्र

राधानगरीत दोन नर वाघ; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सकारात्मक संकेत

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सरहद्दीवरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसरात दोन नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद तेथील ट्रॅप कॅमेऱ्यात व तेथील पाऊल खुणांच्या माध्यमातून झाली आहे.

Rambhau Jagtap

रामभाऊ जगताप/कराड

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सरहद्दीवरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसरात दोन नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद तेथील ट्रॅप कॅमेऱ्यात व तेथील पाऊल खुणांच्या माध्यमातून झाली आहे.

रायबा

नियमित गस्तीदरम्यान तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मिळालेल्या पुराव्यांवरून STR-07 'रायबा' आणि STR-08 'सरदार' असे नामांकन असलेले दोन्ही वाघ नर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी हा परिसर वाघांच्या स्थलांतरासाठी महत्त्वाचा कॉरिडॉर मानला जातो. हा मार्ग पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यंत जोडला गेल्याने वाघांच्या उत्तरेकडील हालचालींना चालना मिळत आहे.

सरदार

वन विभागाच्या माहितीनुसार, या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्या वावर क्षेत्रांचा अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार हे दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून स्वतंत्र क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. वन कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान नोंदवलेले पाऊल खुणा व कॅमेरा ट्रॅप फुटेज पद्धतींच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या भ्रमणमार्ग, पाणवठ्यांचा वापर आणि निवासक्षेत्र यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती