महाराष्ट्र

उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांसोबत संजय राऊतही उपस्थित

नवशक्ती Web Desk

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधानांच्या मुद्द्यांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीची एकजूट तर मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीत मोठी घडामोड घडत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षनेते उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही नेत्यांसोबत संजय राऊतही उपस्थित आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांची भेट पूर्वनियोजित असल्याचे बोलले जात आहे. काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय.बी.ची चव्हाण सेंटरमध्ये बैठक घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.

नववर्षाची गुडन्यूज! १ जानेवारीपासून CNG, PNG होणार स्वस्त; सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा

BMC Election : मुंबई पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर? अंतिम निर्णय अजित पवार घेणार - सना मलिक

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार; शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री; कोणत्याही क्षणी अटक

संतोष देशमुख हत्याप्रकरण : वाल्मीक कराडला जामीन नाकारला