दुष्काळाच्या चर्चेसाठी अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरे यांची मागणी X | ShivSenaUBT_
महाराष्ट्र

दुष्काळाच्या चर्चेसाठी अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरे यांची मागणी

दुष्काळामुळे हवालदिल झालेला शेतकरी मदत कधी मिळणार, याकडे डोळे लावून बसला आहे.

Swapnil S

मुंबई : दुष्काळामुळे हवालदिल झालेला शेतकरी मदत कधी मिळणार, याकडे डोळे लावून बसला आहे. डबल इंजिन सरकारची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. मात्र हे डबल इंजिन सरकार कर्जमुक्ती करू, दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करू, अशा वाफा सोडत आहे, अशी टीका करत दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे - विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी येथे केली.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आपण स्वतः करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी गुरुवारी 'मातोश्री' निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारवर हल्ला चढवला.

"गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता, तेव्हा जमिनी खरडून गेल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार कोटींचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले होते. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपये जाहीर केले होते. परंतु, या ३१ हजार कोटींपैकी खरोखर किती मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली आहे, याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी," असे ठाकरे म्हणाले.

संपूर्ण पीककर्ज माफ करा

महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीची तीव्रता वाढत असताना निकषांचा आणि केंद्राच्या मदतीचा बहाणा न करता किमान २० जिल्ह्यांतील १०० तालुक्यांत तातडीने दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये रोख मदत द्या आणि संपूर्ण पीककर्ज माफी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दुष्काळी दौरे म्हणजे केवळ देखावे आहेत. प्रत्यक्षात शेतकरी पिण्याचे पाणी मागतोय आणि खायचे काय, असा सवाल तो विचारतोय. या दाहक वास्तवाकडे सरकारचे लक्ष नाही. नुसते दौरे करून प्रश्न सुटणार नाही.
- उद्धव ठाकरे

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

Mumbai : साहील वाकोडे मृत्यूप्रकरणी पालकांचे आझाद मैदानावर उपोषण; राहुल गांधींचा वाकोडे कुटुंबाला फोन, आंदोलनाला दिला पाठिंबा

५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड

Mumbai : दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी प्रवास सुसाट; १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार

Mumbai : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा; कलिना भूखंड घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त