संग्रहित फोटो  
महाराष्ट्र

फरार गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरेंचे व्यावसायिक संबंध? संजय निरुपम यांचा आरोप; दिल्ली दौऱ्यात भेटीचा दावा

Swapnil S

मुंबई : देहरादूनमधील एका बिल्डरच्या हत्येतील आरोपी आणि आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यापारी गुप्ता बंधूंशी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला.

७ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासणे आवश्यक आहे. ठाकरे जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा हॉटेल ताज किंवा मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्य करतात. मात्र यावेळी ते संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी का थांबले होते, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कोण आहेत गुप्ता बंधू?

राजेश गुप्ता, अतुल गुप्ता आणि अजय गुप्ता हे उत्तराखंडमधील सहारनपूर येथील रहिवाशी आहेत. ते १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय करू लागले आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जेकब झुमादेखील गुप्ता यांचे व्यवसाय भागीदार होते. २०१८ मध्ये गुप्ता बंधूंचे घोटाळे उघड झाले. यानंतर जेकब झुमा यांची सरकारमधून हकालपट्टी झाली.

घोटाळ्यांनंतर फरार झालेल्या तिन्ही गुप्ता बंधूंविरोधात सरकारने इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अजय गुप्ता यांनी सरकारशी चर्चा करून या घोटाळ्यातून आपले नाव कमी करून घेतल्याची चर्चा आहे. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता दोघेही फरार असून अजय गुप्ता मात्र मुंबईत वास्तव्य करत असल्याचे सांगितले जाते.

अजय गुप्ता आणि अतुल गुप्ता हे देहरादून येथील सचिंदरसिंग सहानी (बाबा सहानी) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. सहानी हे १,५०० कोटींचे डेहराडूनमध्ये मोठे कॉम्प्लेक्स तयार करत होते, मात्र त्यांना पैशांची चणचण होती. २४ मे रोजी बाबा सहानी यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यावेळी त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत गुप्ता बंधूंची नावे होती. तत्पूर्वी बाबा सहानी यांनी देहरादून गुप्ता बंधूंपासून धोका असल्याची तक्रार केली होती.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत