संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार - रामदास आठवले

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असा दावा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे.

Swapnil S

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असा दावा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे.

यावेळी आठवले यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सत्ताधारी 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'मध्ये (एनडीए) सामील होण्याचे आवाहन केले.

फेरबदल लवकरच

भाजपच्या संघटनात्मक बदलांनंतर केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, ज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नव्या नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी स्वतः एनडीएत येण्यास नकार दिला, तरी त्यांच्या पक्षाच्या आठ खासदारांनी देशाच्या विकासासाठी एनडीएचा भाग झाले पाहिजे, असे विधान आठवले यांनी केले.

कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक अभिजित दिपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, समाज आणि पक्षाला बळ देण्यासाठी आरपीआय (अ) मध्ये प्रवेश करावा, असेही आठवले म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मी महाराष्ट्रातच! मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार; दिल्लीत मोदींची भेट, विकास प्रकल्पांबाबत चर्चा

भाजपची ‘नवीन’ टीम जाहीर; तावडे सरचिटणीसपदी कायम, भारती पवार उपाध्यक्ष, स्मृती इराणी, वसुंधरा राजे यांची ‘पदवापसी’

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकेच्या फलंदाजांची कोंडी; भारताला पहिल्या डावात १७८ धावांची मोठी आघाडी

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

आजचे राशिभविष्य, १८ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत