महाराष्ट्र

जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत

पेणमध्ये सुरू झालेल्या पावसाने आंबा आणि कडधान्य शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू

अरविंद गुरव

रायगड (Raigad) जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सकाळी ८च्या सुमारास पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पेणमध्ये (Pen) सुरू झालेल्या पावसाने आंबा आणि कडधान्य शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू झाली. या अवेळी पावसाने आंबा, कांदा आणि कडधान्य उत्पादकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ही अवेळी पावसाचे आगमन झाले होते. यावेळी पेण, खालापुर, रोहा, कर्जत तालुक्याला मोठा फटका बसला होता. पुन्हा आज सकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आडोसा शोधावा लागला. आंबा आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आपले पिक वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. तसेच या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.

आजच्‍या पावसाने आंबा पीका बरोबरच कडधान्‍य पीकाला मोठा फटका बसणार आहे. कडधान्‍य पिकांच्‍या काढणीचा हंगाम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे. उरलेसुरले पीक घरात घेवून येण्‍यासाठी शेतकरयांची लगबग सुरू असतानाच आज पावसाने दाणादाण उडवली. आधीच नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे झालेले नाही आहेत. त्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग