महाराष्ट्र

ग्रामीण महाराष्ट्राला अवकाळी-गारपिटीने झोडपले, पुढील 5 दिवसात 'या' भागांत गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Swapnil S

मुंबई : पुढील पाच दिवसात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तसेच, विदर्भात गारपीट, वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील काही भागात वादळी वारे, गारपीट झाल्याने हरभरा, गहू, फळबागा यांचे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

गारपिटीने मंगरूळपीर-कारंजा मार्गावर विजेच्या तारा तुटल्या तर वन्य पशुपक्ष्यांनाही प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. शेतांमध्ये गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास ४० ते ५० किलोची गार तयार झाली होती, असे वृत्त आहे.

कन्नड व सिल्लोड या तालुक्यात गारपीट तसेच वादळी पावसाने रब्बी हंगामातील यंदाची पिकेही उद्ध्वस्त केली, यात ज्वारी, गहू, हरभरा ही पिके आडवी पडली आहेत.

अकोला जिल्ह्यातही अकोट, तेल्हारा तालुक्याच्या काही भागात पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग