ANI
महाराष्ट्र

वाशी-स्वारगेट शिवनेरी बससेवा बंद

प्रवाशांमध्ये नवीन सेवेबाबत जनजागृती करणे आवश्यक असताना तसे न करता एसटी महामंडळाकडून अवघ्या चार दिवसात नव्याने सुरू केलेली शिवनेरी बससेवा बंद करण्यात आल्याचे निदर्शनास

नवशक्ती Web Desk

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसची संख्या अधिक आहे. मात्र नवी मुंबईतील प्रवाशांना अनेकदा बसमध्ये आसन मिळत नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच ८ मे रोजी एसटी महामंडळाकडून वाशी-स्वारगेट मार्गावर शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली. मात्र या बस विषयी प्रवासी अनभिज्ञ असल्याने बसेस रिकाम्या धावत होत्या. प्रवाशांमध्ये नवीन सेवेबाबत जनजागृती करणे आवश्यक असताना तसे न करता एसटी महामंडळाकडून अवघ्या चार दिवसात नव्याने सुरू केलेली शिवनेरी बससेवा बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच गाडी बंद झाल्याने मुंबई विभागाच्या कामगिरीवर एसटी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रवासी प्रतिसाद नसल्याने या मार्गावरील सेवा बंद करण्यात आल्या असून पुणे विभागाकडे शिवनेरी गाड्या देण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

पुण्याहून मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी प्रवासी संख्या कमी आहे. अल्प प्रतिसाद पाहून ही सेवा बंद केली आहे. यामध्ये काही सुधारणा करण्याचा आम्ही विचार करू.

- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

एकनाथ शिंदे अडचणीत; बेकायदा इमारतींना अभय दिल्याचा आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य