महाराष्ट्र

Video: सणासुदीला नाशिकच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अडकलेले पतंग काढायला गेला, १० वीचा विद्यार्थी विजेच्या धक्क्याने जीवाला मुकला

या घटनेने भाग्येशच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rakesh Mali

नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येलाच एका कुटुंबावर दु:खाचा आहे. विजेच्या तारांमध्ये अडकलेली पतंग स्टीलच्या रॉडचा वापर करुन काढण्याचा प्रयत्न करताना एका दहावीत शिकणाऱ्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. भाग्येश विजय वाघ असे या 15 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील साईराम रो हाऊसजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने भाग्येशच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुलांचा एक ग्रुप पतंग उडवण्यात मग्न होता. यावेळी त्यांच्यातील भाग्येश अडकलेले पतंग एका स्टीलच्या रॉडच्या सहाय्याने काढत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर परिसरातील नागरिकांनी भाग्येशला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरिक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांज्याची विक्री व वापरावर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन