महाराष्ट्र

विनायक पाटील राज्यात प्रथम; राज्यसेवा मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला. एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६३३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर याने राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे याने तृतीय क्रमांक मिळवला.

परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल. २३ संवर्गांपैकी ज्या पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे, केवळ त्याच पदासाठी पसंतीक्रम सादर करावेत. निवडीसाठी इच्छुक नसलेल्या पदासाठी नो प्रेफरन्स हा पर्याय निवडावा. पसंतीक्रम सादर केल्यानंतर त्याची पीडीएफ उमेदवाराला डाऊनलोड करून जतन करता येणार आहे. पसंतीक्रमाचे पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक असून, त्यासाठीची अंतिम मुदत २९ जानेवारी आहे. या मुदतीनंतर संवर्ग, पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची किंवा बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस