महाराष्ट्र

मोबाईल बंदीमुळे मतदारांचा गोंधळ; उपाययोजना करण्याची केली मागणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या उत्साहात मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मात्र मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल बंदी केल्याने मोबाईल द्यायचा कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना सतावत होता.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या उत्साहात मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मात्र मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल बंदी केल्याने मोबाईल द्यायचा कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना सतावत होता. अखेर रांगेतील व्यक्तींकडे मोबाईल देत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मोबाईल बंदी न करता केंद्रांवर मोबाईल जमा करून मतदान करता येईल यासाठी काही तरी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मतदारांनी केल्या.

बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या उत्साहात सहभागी होण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर आल्यावर गैरसोयीचा सामना करावा लागला. कारण होते मोबाईल बंदी. मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी याबाबत विविध माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. मात्र मतदान करून पुन्हा कामासाठी बाहेर पडलेले किंवा कामावर जाणाऱ्या मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मतदान केंद्रावर आल्यावर आत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचे पोलिसांनी प्रवेशद्वारावर सांगितल्यानंतर मोबाईल ठेवायचा कुठे? असा प्रश्न मतदारांना पडला होता. सोबत कोणी असल्यास मोबाईल त्याच्याकडे देत काहींनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र एकट्याच आलेल्या मतदाराला मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या पुढील निवडणुकीत मोबाईल बंदी केली तरी मतदाराचा मोबाईल सुरक्षित राहिल याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी मतदार राजांनी केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी