महाराष्ट्र

विधान परिषदेच्या चार जागांसाठी १० जूनला मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने बुधवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली.

Swapnil S

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने बुधवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली. त्यानुसार या चार मतदारसंघात येत्या १० जून रोजी मतदान होऊन १३ जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. तर २२ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. २४ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर २७ मे २०२४ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. १० जून २०२४ रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होईल. १३ जून रोजी मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर केला जाईल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक