‘समृद्धी’ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; वाशिममध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिसांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांना रोखले (X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
महाराष्ट्र

‘समृद्धी’ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; वाशिममध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिसांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांना रोखले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळत असल्याच्या निषेधार्थ समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी निघालेले उबाठाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Swapnil S

वाशिम : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळत असल्याच्या निषेधार्थ समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी निघालेले उबाठाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच पीकविमा दाव्यांचा तातडीने निपटारा करावा आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशीही त्यांची मागणी आहे.

शेकडो उबाठा कार्यकर्ते आणि शेतकरी हे वानोजा येथे समृद्धी महामार्गावर ‘रास्ता रोको’ करण्यासाठी निघाले होते. मात्र, महामार्गावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आमदार देशमुख आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महामार्गावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र,तरीही आंदोलन करण्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशासनाने दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलक लगतच्या शेतांमधून किंवा महामार्गाच्या इंटरचेंजला वळसा घालणाऱ्या पर्यायी मार्गांचा वापर करून महामार्गावर प्रवेश करू शकतात, अशी शक्यता लक्षात घेऊन वानोजा परिसरासह महामार्गावरील देखरेखही वाढवण्यात आली होती.

मदत अपुरी असल्याचा आरोप

सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत अपुरी असल्याचा आरोप उबाठा नेत्यांनी केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाई द्यावी आणि पीकविमा दाव्यांचा जलदगतीने निपटारा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तू..तू..मैं..मैं.. सुरूच; भाजप-शिंदेसेनेतील वाद चिघळला

IDBI विक्रीवरून गदारोळ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

संधींच्या विस्ताराची बारा वर्षे

तिकडे ‘सुलवेसी’, इकडे ‘कर्जत’...

आजचे राशिभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत