महाराष्ट्र

जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले; ३१४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी जलाशय ९८ टक्के क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधून येणारी आवक बघता सोमवारी दुपारच्या सुमारास नाथसागर जलाशयाच्या सांडव्याद्वारे ६ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीत एकूण ६ दरवाजे प्रत्येकी ५ फुटाने उघडण्यात आले असून एकूण ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन प्रशांत जाधव यांनी केले आहे. याप्रसंगी तांत्रिक विभागाचे विजय काकडे, गणेश खरडकर आदींची उपस्थिती होती.

जलाशयाच्या पायथ्याशी पोलीस बंदोबस्त

जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शकाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच ठिकठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत