महाराष्ट्र

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदाराचे वादग्रस्त विधान

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई: आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे व केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे प्रतापराव जाधव यांनी स्वतःच आपण तीन पिढ्यांपासून वीजबिल भरत नसल्याची आपल्याच कबुली देऊन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी