गडचिरोली : माओवाद संपला, तरी शस्त्रसाठा जप्त (Photo-X)
महाराष्ट्र

गडचिरोली : माओवाद संपला, तरी शस्त्रसाठा जप्त

महाराष्ट्राला नुकतेच माओवादीमुक्त घोषित करण्यात आले असतानाच, गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट कोपारशी जंगलात लपवून ठेवलेला शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राला नुकतेच माओवादीमुक्त घोषित करण्यात आले असतानाच, गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट कोपारशी जंगलात लपवून ठेवलेला शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे नक्षलवादाचा बीमोड झाल्यानंतरही जंगलात अद्याप किती प्रमाणात शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत, याबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गडचिरोली पोलीस दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल ऑपरेशन्स टीमची पाच पथके आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाची दोन पथके या शोधमोहिमेत सहभागी झाली होती.

पुरून ठेवलेला शस्त्रसाठा हस्तगत

खडतर आणि दुर्गम भागात कसून शोध घेतल्यानंतर सुरक्षा दलांनी जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा व नक्षलवादी साहित्य हस्तगत केले. तेथील काही नक्षलवादी साहित्य घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा ०१ .३०३ रायफल, ०२ सिंगल-शॉट रायफल्स, ०२ गावठी पिस्तुले, ०१ बॅरल ग्रेनेड लाँचर, १० बीजीएल शेल्स, २१ जिवंत काडतुसे, ०७ डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, ०२ मॅगझिन, ०२ प्रेशर कुकर (आयईडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे), ०३ वॉकी-टॉकी (चार्जर व अतिरिक्त बॅटऱ्यांसह) असा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नानापर्व निमाले! मराठी, हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

विरोधकांचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन; ज्ञानेश कुमारांविरोधात राजघाटावर काँग्रेसचा ठिय्या

SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके

नाना सर, मैत्री अन् आदराचा अत्यंत सुरक्षित सोबती - सोनाली कुलकर्णी

आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या; देयकाची रक्कम न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल, आतापर्यंत ९ कंत्राटदारांनी केली आत्महत्या