महाराष्ट्र

Budget 2024: दिल्लीसमोर लाचारी करणाऱ्या महायुतीला काय मिळाले -आदित्य ठाकरे

केंद्राला महाराष्ट्राबाबत इत​का द्वेष का, असा सवाल उपस्थित करत दिल्लीसमोर लाचारी करणाऱ्या महायुतीला काय मिळाले, असा टोला शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीला लगावला.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशला भरभरून दिले. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा ‘म’ देखील नाही. विशेष म्हणजे सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जातो. परंतु केंद्राच्या अर्थसंकल्पात राज्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. केंद्राला महाराष्ट्राबाबत इत​का द्वेष का, असा सवाल उपस्थित करत दिल्लीसमोर लाचारी करणाऱ्या महायुतीला काय मिळाले, असा टोला शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीला लगावला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश, बिहारसाठी विशेष निधीची तरतूद केली. महाराष्ट्राचा साधा उल्लेख अर्थसंकल्पात केलेला नाही. महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? संविधान विरोधी सत्तेला महाराष्ट्राने आळा घातला आहे. भाजपप्रणित सरकारने त्यामुळे सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्रावर राग काढला का, असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला.

राज्यातील उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करून शासनाची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचे राजकारण करायला येते. परंतु, केंद्राकडून ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा मिळाला. केंद्राकडून निधी आणायला आणि राज्याचे भले करण्याची धमक महायुती सरकारमध्ये नाही, अशी सडकून टीका आदित्य यांनी केली.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?