Maharashtra SSC Result 2024 Date: महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा यंदाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. तेव्हापासून महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याबद्दल उत्सुकता होती. अखेरीस ही प्रतीक्षा संपली आणि बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे एसएससी म्हणजेच दहावी परीक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना २७ मे रोजी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन बघता येणार आहे. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. तर, मार्कशीटसाठी मात्र काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
१ मार्च ते २६ मार्च या कालावधीत महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा झाली होती. माहितीनुसार या परीक्षेला सुमारे १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थी बसले होते.
कसा बघायचा निकाल?
- विद्यार्थी mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकता.
- दहावी रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या स्किनवर नवीन पेज ओपन होईल.
- त्यावर मागितलेली माहिती भरून सबमिट करा
- सगळी माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता.