महाराष्ट्र

"गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना...", लालकृष्ण आडवाणींना 'भारतरत्न' जाहीर झाल्यावर राज ठाकरे म्हणाले...

"करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना..."

Rakesh Mali

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आडवाणींचे अभिनंदन केले आहे. तसेच, "गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो", असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

"करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता", असेही राज यांनी म्हटले. त्यांनी 'एक्स'वर याबाबतची पोस्ट केली आहे.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन-

दरम्यान, लालकृष्ण आडवाणी यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणींची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असून भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच, आडवाणी यांची संसदीय कारकिर्द समृद्ध राहिली असल्याचेही ते म्हणाले.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!