ANI
ANI
महाराष्ट्र

दसरा मेळावा नेमका कोणाचा ? आदित्य ठाकरेंचा घणाघात

प्रतिनिधी

शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी राजकीय वर्तुळासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख कोणती भूमिका घेणार आणि कोणावर हल्लाबोल करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. यंदा मात्र दसरा मेळावा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. यावेळी दसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा होणार की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा? यावर बरीच चर्चा होत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे योग्य ते नियमानुसार होईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या मेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

आम्हीच खरी शिवसेना असल्याचे सांगणारे एकनाथ शिंदे गट दसरा मेळावा घेणार की शिवसेनेला परवानगी देणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचाच राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. “आम्ही सतत परवानगीसाठी प्रयत्न करत आहोत. मात्र देशद्रोही सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत आहे. या सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र शिवतीर्थावर फक्त शिवसेनाच जमते अशी प्रथा आहे. लोकही बघत आहेत. महाराष्ट्राची अनेक वर्षांची राजकीय परंपरा मोडीत काढत हा विश्वासघात केला गेला आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल