महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

या बैठकीत तब्बल दोन तास महत्वाच्या विषयावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

नवशक्ती Web Desk

शनिवार (30 सप्टेंबर) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही महत्तवपूर्ण बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र यांच्यात झालेल्या या बैठकीत तब्बल दोन तास महत्वाच्या विषयावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वत्र या बैठकीची चर्चा सुरू होती. या बैठकी मागचं कारण नुकतेच समोर आले आहे. या बैठकीत राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा देखील या बैठकीत झाल्याचं समजत आहे.

राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या मंत्र्याकडे कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांकडून सुरू असल्याची सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मंत्रीमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प

नेरळ-माथेरान ऐतिहासिक मिनी ट्रेन पुन्हा धावणार! १ नोव्हेंबरपासून सेवा सुरू होण्याची शक्यता

ऐन 'ऑक्टोबर हिट'मध्ये पावसाचा झिम्मा! मुंबई परिसरात पावसाची संततधार; पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज