महाराष्ट्र

दौंड ते वाडीदरम्यान सुरक्षा कुंपणाचे काम सुरू

संवेदनशील असणाऱ्या बाळे-सोलापूर आणि बोरीवेल-मलठण अशा दोन ठिकाणी ४०० मीटर इतक्या सुरक्षा कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे.

Swapnil S

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे अपघात आणि इतर जीवित हानी रोखण्यासासाठी संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कुंपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दौंड ते वाडीदरम्यान रेल्वेमार्गावर अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तेथे सुमारे १५ किलोमीटर अंतराचे सुरक्षा कुंपण उभारण्यात आले आहे. याच रेल्वेमार्गावर अक्कलकोट भागातील अतिसंवेदनशील असणाऱ्या बोरोटी ते दुधनी दरम्यान सर्वात लांब २.४ किलोमीटर इतके तारेचे कुंपण उभारण्यात आले आहे.

संवेदनशील असणाऱ्या बाळे-सोलापूर आणि बोरीवेल-मलठण अशा दोन ठिकाणी ४०० मीटर इतक्या सुरक्षा कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. या संरक्षक कुंपणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग हा प्रतितास १३० किलोमीटरपर्यंत वाढू शकणार आहे. यातून सुरक्षितताही जपण्यास मदत होणार आहे. मागील वर्षभरात सोलापूर विभागातील रेल्वेमार्गावर सुमारे शंभरपेक्षा जास्त जनावरे रेल्वेगाड्यांखाली चिरडली गेली होती. त्याचा विचार करता स्थानिक शेतकरी आणि गोपालकांनी आपली जनावरे रेल्वेरुळाजवळ आणू नयेत. अन्यथा रेल्वे सुरक्षा बलाकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प