महाराष्ट्र

यशोमती ठाकूर यांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्याचा काँग्रेसच्या माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला.

Swapnil S

अमरावती : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्याचा काँग्रेसच्या माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला.

“चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तुम्ही जरा तुमच्या जिभेवर लगाम आणा. पुन्हा अशी भाषा वापरल्यास तुमची गाठ सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी असेल,” असा इशारा ॲॅड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर अत्यंत वैयक्तिक टीका केली होती. त्यांच्या विधानावर पलटवार करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, चंद्रशेखर बावनकुळे हे एक गंभीर राजकीय नेते असून वैचारिक पातळीवर ही लढाई लढतील, असे वाटले होते; मात्र ते चक्क वैयक्तिक पातळीवर येऊन बोलत आहेत. राहुल गांधी हे देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि ज्या गांधी-नेहरू घराण्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे वैयक्तिक टीका करण्याइतकी बावनकुळेंची राजकीय उंची नाही.

स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

जनता सरकारवर किती नाराज आणि असंतुष्ट आहे, हे त्याचा रोष पाहिल्यावर समोर येते. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज गायब आहे, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने पिकांची नासाडी होत आहे, पण अशा गंभीर विषयांकडे शासनाचे लक्ष नाही. बावनकुळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जबाबदार मंत्री आहात, पदाची गरिमा बाळगा. पातळी सोडून विधाने करणे बंद करा; अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते शांत बसणार नाहीत आणि जशास तसे उत्तर दिले जाईल,” असेही त्यांनी खडसावले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra Legislative Council Elections 2026: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

साबण, शाम्पू आणि टूथपेस्टवर आता 'शाकाहारी', 'मांसाहारी' चिन्ह अनिवार्य; केंद्र सरकारचा नवा नियम

Mumbai : 'गॅलॉप्स' सह ५ रेस्टॉरंट्सचे परवाने केले निलंबित

फाळके पुरस्काराने अनंत नाग सन्मानित; कार्तिक आर्यन, ममूटी सर्वोत्कृष्ट अभिनेते, यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण