महाराष्ट्र

यवतमाळ हादरलं! ट्रकच्या धडकेने ओमनी कारचा चेंदामेंदा ; चार जण ठार

नवशक्ती Web Desk

आज सकाळी ६ वाजेदरम्यान यवतमाळ येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका अज्ञात वाहनाने ओमनी गाडीला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखणी झाला होता. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यंवतमाळच्या करंजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठोडा गावाजवळ एका ओमनीला अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला. ही गाडी वरोरो येथून वृत्तपत्र घेऊन पांढरकवडाच्या दिशेनं जात होती.

नागपूर येथून मराठी वृत्तपत्र पार्सल घेऊन जाणारी ओमनी कार आज सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडाकडे रवाना झाली. महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलाजवळ समोरुन येत असलेल्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघाता ओमनीचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. यात चालक, वाहक आणि दो प्रवासी अशा चार चणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.

या अपघातानंतर ट्रकसह चालक पसार झाला. हा अपघात एवढा भीषण आहे की अजुनही मृतदेह हे ओमनीमध्ये अडकलेले आहेत. पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह ओमनीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा