महाराष्ट्र

कल्याण तरुणी आत्महत्या ; हत्येच्या दिशेने तपास करण्याची भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट भाजप नेत्या वाघ यांनी आज सायंकाळी घेतली. प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बसीर शेख यांची भेट घेतली

निलम चौधरी

कल्याणमधील त्या तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असून हत्येच्या दिशेने पोलिसांनी तपास करण्याची मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. कल्याणमधील एका अल्पवयीन तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. यामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या केली. पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट भाजप नेत्या वाघ यांनी आज सायंकाळी घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बसीर शेख यांची भेट घेतली.

यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितले की, पिडीत तरुणीवर चार वर्षापासून लैगिंक अत्याचार केला जात होता. या प्रकरणात सात तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. त्यापैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या तरुणीचा शोध सुरु आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियानी माहिती दिली आहे की, मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

इस्टाग्रामवरील अॅपवर पिडीत तरुणीला व्हीडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे आयटी कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाही. ही कलमे लावून पिडीत तरुणीच्या कुटुंंबीयांना न्याय द्यावा. या प्रकरणात बडय़ा घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे.

पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच मुलीच्या मामाला तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना एफआरआयची कॉपी दिली नव्हती. तिचे कुटुंबिय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. आठ दिवसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखी वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आारोपींनी अन्य कोणासोबत हाच प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकतो असे वाघ यांनी सांगितले.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण