('एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा)
महाराष्ट्र

जीव वाचवण्यासाठी तरुणाचा आमदारांच्या बंगल्यात प्रवेश

उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर वाऱ्यासारखी पसरली होती.

Swapnil S

उरण : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील सत्य समोर आले असून, आमदारांच्या घरावर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण शहरातील एक तरुण आपल्या मित्रांसोबत पार्टी करत असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून संबंधित तरुणाने तेथून पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो थेट आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यात शिरला. दरम्यान, 'आमदारांच्या बंगल्यावर हल्ला' अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उरण पोलीस ठाणे यांनी तपास केल्यानंतर संबंधित तरुणाने केवळ संरक्षणासाठी तेथे आश्रय घेतल्याचे निष्पन्न झाले..

रिक्षा-टॅक्सीचालकांना तीन महिने मुदतवाढ; मराठी शिकण्यासाठी आणखी अवसर, प्रशिक्षणाचा १ लाख ६५ हजार ८०० चालकांनी घेतला लाभ

गडचिरोली : संघर्षातून समृद्धीकडे

दिमागी नक्षल म्हणजे काय रे भाऊ?

आजचे राशिभविष्य, २६ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हेल्दी खायचंय? मखाना, मिलेट्ससह 'हे' पौष्टिक पर्याय जाणून घ्या