महाराष्ट्र

शहाजीबापू पाटील यांच्याविरुद्ध युवासेना आक्रमक ; काय आहे कारण ?

काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्के.. या आपल्या डायलॉगबाजीने फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये

वृत्तसंस्था

काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्के.. या आपल्या डायलॉगबाजीने फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. मात्र यावेळी ते आपल्या डायलॉगबाजीमुळे नाही तर त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेमुळे चर्चेमध्ये आलेत. शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज माळशिरस तालुक्यातील संगम येथे युवासेनेच्या वतीने "संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद" अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सांगोला येथे भाड्याने बंगले देतो, असे वक्तव्य शहाजीबापूंनी केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली. युवासेनेने बॅनर लावून आमदार शहाजी बापू पाटील यांना गाढव म्हटले आहे.

स्वतःच्या बायकोला बरेच दिवस लुगडं न घेतल्याचे बोलणारे पाटील बंगले भाड्याने देण्याचे वक्तव्य करत असल्याने त्यांच्या बेताल वक्तव्यांचा युवासेनेने चांगलाच समाचार घेतला. यावेळी युवासेनेने शहाजीबापूंचा 'संत्रा आमदार' आणि शिंदे गटाचा 'जॉनी लिव्हर' असा उल्लेख केला. ‘बापू मतदारसंघाकडे लक्ष द्या, महाराष्ट्राचा मनोरंजन दौरा बंद करा असेही त्यांनी सुचवले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत