प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

राज्यात झिका विषाणूचे टेन्शन! २८ रुग्णांची नोंद; बाधित रुग्णांच्या परिसरात स्क्रिनिंग, आरोग्य विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

Swapnil S

मुंबई : एडिस डासांमुळे झिका विषाणूचा प्रसार होतो. राज्यात झिका विषाणूची लागण झालेल्या २८ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर परिसरात स्क्रिनिंग करण्यात येत असून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत: एडिस डासांद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडिस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेतंर्गत रूग्णाच्या तीन ते पाच किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येत आहे. गर्भवती महिलांचे रक्ताचे नमुने संकलित करुन तपासणी, सर्व रूग्णांना लक्षणांवर आधारीत उपचार, गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी किटकशास्त्रीय उपाययोजना करण्यात येत आहेत.

असे आढळले रुग्ण

राज्यामध्ये झिका या आजाराचे जानेवारी ते २६ जुलैपर्यंत एकूण २८ रूग्ण आढळलेले आहेत. यामध्ये २४ रूग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. तर एक रूग्ण सासवड (पुणे) येथे, एक भूगांव मुळशी (पुणे) येथे आणि मे २०२४ मध्ये एक कोल्हापूर व एक संगमनेर येथे आढळून आला आहे.

आजार टाळण्यासाठी हे करा!

गावातील सर्व पाणी साठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, जे घरातील पाणीसाठे रिकामे करता येत नाही, त्यामध्ये गप्पीमासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वाप करावा. निरूपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?