मुंबई

उपनगर वासियांचाही गारेगार प्रवास, १० एसी डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत

कुर्ला - बीकेसी दरम्यान या बसेस चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांनंतर दोन्ही उपनगरातील प्रवाशांचा गारेगार प्रवास होणार आहे.

प्रतिनिधी

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता उपनगरात ही वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला - अंधेरी व

कुर्ला - बीकेसी दरम्यान या बसेस चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांनंतर दोन्ही उपनगरातील प्रवाशांचा गारेगार प्रवास होणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने बेस्टने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रवाशांसाठी पुरेसा बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्ट उपक्रम प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात गेल्या २१ फेब्रुवारीपासून वातावरण पूरक वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या एकूण ३९ इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या दाखल झाल्या असून त्यापैकी २० बसगाड्या दक्षिण मुंबईत व १० बसगाड्या मुंबई उपनगरामध्ये प्रवर्तित करण्यात येणार आहेत. तर उर्वरित ९ गाड्या टप्याटप्याने मुंबई उपनगरांमध्ये प्रवर्तित केल्या जाणार आहेत. या बसगाड्यांतून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायु प्रदुषण होत नाहीत. सदर बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटिव्ही आणि मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

बस पुरवठादार स्विच मोबिलीटी या संस्थेला एकूण २०० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या पुरवठा करण्याचे कायादेश देण्यात आले असून यापैकी ३९ बसगाड्या याआधीच ताफ्यात दाखल झाल्या आहे. उर्वरित बसगाड्या मार्च २०२४ अखेरपर्यंत ताफ्यात येणार आहेत.

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा; DGCA चे आदेश