मुंबई

दुकानदारांना १० दिवसांचा अल्टीमेटम;सोमवारपासून कारवाईचा पालिकेचा इशारा

दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा नसतील अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल

प्रतिनिधी

दुकानांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील अशा मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. पुढील १० दिवसांत दुकानांवर मराठी पाट्या लावा, असे स्पष्ट आदेश पालिकेने दुकानदारांना दिले

आहेत. सोमवारपासून दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा नसतील अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. दरम्यान, एका कामगारामागे एक हजारांचा दंड आकारण्यात येईल, असे पालिकेच्या दुकान व अस्थापने विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने, आस्थापना असून त्यापैकी ५० टक्केच दुकानांनी मराठी पाट्यांचा नियम अमलात आणला आहे; मात्र, आता उर्वरित सुमारे दोन लाखांहून अधिक दुकानांची सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत ज्या दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाटी नसेल त्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असे दुकान व अस्थापने विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, यापूर्वी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे.

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

Mumbai : एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम आज रात्रीपासून

Satyacha Morcha Mumbai : मविआचा एल्गार; उद्धव, राज, शरद पवार यांच्यासह विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

Satyacha Morcha : मुंबईत सत्याचा जयघोष! सीएसएमटी स्थानक परिसर घोषणांनी दणाणला; हजारोंच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते सहभागी

भारत लवकरच नक्षलमुक्त होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; छत्तीसगढ विधानसभा संकुलाचे उद्घाटन