मुंबई

गाळा खरेदी-विक्रीप्रकरणी १० लाखांची फसवणुक

बोगस दस्तावेज बनवून गाळा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला

नवशक्ती Web Desk

मुंबई : बोगस दस्तावेज बनवून गाळा खरेदी-विक्रीचा व्यवहार करून सुमारे १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कृष्णा बबन वाळवणकर या आरोपीविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मीरारोडमध्ये राहणाऱ्या तक्रारदाराच्या भावाच्या मित्राचा म्हणजेच कृष्णाचा दहिसरमध्ये गाळा आहे. तक्रारदार आणि कृष्णा यांच्यात १५ लाखांमध्ये हा गाळा विकत घेण्याचा करार झाला होता. त्यापैकी १० लाख रुपये दिल्यावर दोन महिन्यांत तो गाळ्याचा ताबा देणार होता. त्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कृष्णाने गाळ्याचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करूनही तो त्यांना टाळत होता. अखेर कृष्णा पळून गेल्याने हरिश्‍चंद्र मिश्रा याने कृष्णाविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती.

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका