मुंबई

Mumbai : शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मंगळवार, २७ जानेवारीपासून शनिवार, ७ फेब्रुवारीपर्यंत काम चालणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मंगळवार, २७ जानेवारीपासून शनिवार, ७ फेब्रुवारीपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात‍ येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी महापालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्येदेखील ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

'या' भागात १० टक्के पाणी कपात

शहर

  • ‘ए’ विभाग - नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र

  • ‘बी’ विभाग - संपूर्ण विभाग

  • ‘सी’ विभाग - भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला क्षेत्र

  • ‘ई’ विभाग - पूर्ण विभाग

  • ‘एफ दक्षिण’ विभाग - संपूर्ण विभाग

  • ‘एफ उत्तर’ विभाग - संपूर्ण विभाग

पूर्व उपनगरे

  • ‘टी’ विभाग - मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र

  • ‘एस’ विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र

  • ‘एन’ विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर

  • 'एल’ विभाग - कुर्ला (पूर्व) क्षेत्र

  • ‘एम पूर्व’ विभाग – संपूर्ण विभाग

  • ‘एम पश्चिम’ विभाग – संपूर्ण विभाग

मुंबईचा महापौर भाजपचाच, नाहीतर विरोधी पक्षात बसू! सुधीर मुनगंटीवार यांचा शिंदेसेनेला थेट इशारा

व्यापार करारांमुळे युवकांसाठी नव्या संधी खुल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ६१ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी २७ जानेवारीला सर्वपक्षीय बैठक; २८ जानेवारीला राष्ट्रपतींचे अभिभाषण

भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ घटवू! अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेण्ट यांचे संकेत

आजचे राशिभविष्य, २५ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत