मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या याचिकेच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला. मंगळवारी न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवत सुनावणी ११ ऑक्टोबरला निश्चित केली.
१०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. तर अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत मला तुरुंगात काठेवण्यात आले आहे. आतातरी मला जामीन द्या अशी विनंती करत ॲड. रौनक नाईक यांच्या मार्फत जामिनासाठी याचिका केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि यांच्या खंडपीठाने वाझेच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. तसेच अन्य खंडपीठाकडे जाण्यास सांगितले होते.