मुंबई

मुंबईच्या स्वच्छतेसाठी तब्बल १२०० कोटी; एकाच कंत्राटदारावर मुंबईच्या स्वच्छतेची जबाबदारी

Swapnil S

मुंबई : मुंबईसह उपनगरातील स्वच्छतेची जबाबदारी आता एकाच कंत्राटदारावर असणार आहे. पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात येणार असून १२०० कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे ‘दत्तक वस्ती योजना’ आता कायमची हद्दपार होणार आहे.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या धोरणानुसार विशेषत: झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

स्वतंत्र धोरणांतर्गत कंत्राटदारांची जबाबदारी

झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोट्या गटारांची सफाईसाठीदेखील स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या सफाईची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असेल. दिवसातून दोन ते तीन वेळा या स्वच्छतागृहांची स्वच्छता कारवी लागेल.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था