मुंबई

ऑनलाईन फसवणुकीच्या दोन विविध गुन्ह्यांत १३ लाखांची फसवणूक

धमकी देऊन दंड म्हणून पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते

नवशक्ती Web Desk

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या दोन विविध गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांनी दोन महिलांची सुमारे १३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत. पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिलेला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. हॉटेल टुरिझम यांच्यावर रेटींग दिल्यावर तिला चांगले कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. काही दिवसांनी तिला वेगवेगळ्या टास्कमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिने या टास्कसाठी ९ लाख ६८ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. दुसऱ्या घटनेत एका २८ वर्षांच्या तरुणीची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक केली. डेटा इंट्रीचे काम करून पैसे कमविण्याची संधी असल्याची बतावणी करून या तरुणीला काम देण्यात आले होते. नंतर काम पूर्ण केले नाही म्हणून तिला कोर्टाद्वारे लिगल नोटीस पाठविण्याची धमकी देऊन दंड म्हणून पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क