मुंबई

मुंबईत १४ हजार जाहिरात फलक हटविले, विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेची कारवाई

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

परवाना संपलेले आणि अनधिकृतरीत्या प्रदर्शित केलेले साहित्य हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली.

राजकीय फलकांचाही समावेश

धार्मिक स्वरूपाचे ७ हजार ७१५ बॅनर, ३ हजार १७४ फलक (बोर्ड) आणि ५७९ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ८०७ बॅनर, ७०५ फलक (बोर्ड), ८७ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे २६० बॅनर, २७ फलक (बोर्ड), ३१ पोस्टर्स तसेच ९८५ झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे.

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

Mumbai : विसर्जन सुरक्षित पार पडण्यासाठी दक्षता घ्या! अतिरिक्त आयुक्त डॉ. ढाकणे यांचे निर्देश

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार