मुंबई

पोलीस लॉकअपमध्ये १९ वर्षांच्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपीला वेळीच तिथे उपस्थित पोलिसांनी ताब्यात घेऊन जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Swapnil S

मुंबई : रॉबरीच्या गुन्ह्यांत अटकेनंतर लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या एका १९ वर्षांच्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती. या आरोपीला वेळीच तिथे उपस्थित पोलिसांनी ताब्यात घेऊन जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. फैजान इरफान शेख असे या आरोपीचे नाव असून गरोदर पत्नीची देखभाल करण्यासाठी कोणीही नसल्याने मानसिक नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्याची पत्नी सात महिन्यांची गरोदर आहे. घरी एकटीच असल्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी कोणीही नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने नंतर पोलिसांना सांगितले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर