मुंबई

सीएसएमटी हेरिटेज इमारतीत २ शिल्पांचे अनावरण; गणपती आणि हनुमानाचे शिल्प : कला जतन करण्यासाठी मध्य रेल्वेचा प्रयत्न

मध्य रेल्वेने कलेचा प्रचार आणि जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज (सीएसएमटी) इमारतीत २ शिल्पांचे अनावरण करण्यात आले आहे. गणपती आणि हनुमानाचे शिल्प इमारतीमध्ये साकारण्यात आली आहेत.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने कलेचा प्रचार आणि जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज (सीएसएमटी) इमारतीत २ शिल्पांचे अनावरण करण्यात आले आहे. गणपती आणि हनुमानाचे शिल्प इमारतीमध्ये साकारण्यात आली आहेत.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी मध्य रेल्वेच्या कलेचा प्रचार आणि जतन करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत २ शिल्पांचे अनावरण शुक्रवारी केले. कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या कला स्पर्धेची विजेती भारतीय कलाकार सोनाली अय्यंगार यांनी भगवान गणपती - मुंबईचे मूलतत्व आणि भगवान हनुमान - कालातीततेचे प्रतीक यांच्या बनवलेल्या शिल्पांचे महाव्यवस्थापकांनी अनावरण केले.

कलाकाराचा सत्कार करताना यादव म्हणाले, हा उत्कृष्ट उपक्रम आहे. भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशाच प्रकल्पांसाठी आणखी संभाव्य ठिकाणे मध्य रेल्वे शोधणार आहे. या उपक्रमाद्वारे, भारतीय कलाकारांना देशातील इतर ऐतिहासिक आणि प्रसिद्ध वास्तूंमध्ये त्यांचे कार्य भारत आणि परदेशातील लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी अशाच संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी आम्हाला आशा आहे.

शिल्पे तयार करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया, मातीची शिल्पकला, मेणाचे पॉलिशिंग, पीओपी शिल्पकला, रबर द्रवपदार्थाचे अनेक थर, त्यानंतर बेस शिल्प तयार करण्यासाठी फायबरग्लासचे अनेक कोट आणि त्यानंतर वेल्डिंग, पेंटिंग, दोन शिल्पे सुशोभित करणे, अशी प्रदीर्घ प्रक्रिया असून कलाकाराने विक्रमी १ महिन्यात पूर्ण केले. मध्य रेल्वेच्या स्वदेशी संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याच्या या उपक्रमामुळे भारतीय कलाकारांसाठी भविष्यात अधिक संधी निर्माण करण्यास उत्सुक आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?