मुंबई

फ्लॅटसह व्यावसायिक गाळ्यासाठी महिलेची २५ लाखांची फसवणुक

फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक तर दुसर्‍याचा शोध सुरु

प्रतिनिधी

मुंबई - फ्लॅट व्यावसायिक गाळा स्वस्तात देण्याच्या आमिषाने एका महिलेची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस आंबोली पोलिसांनी अटक केली. शशिपाल जाधव असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दिगंबर लोणे याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ३९ वर्षांची तक्रारदार महिला ही चेंबूर येथील एका खाजगी महिलांसाठी असलेल्या वसतीगृहात राहते. पाच वर्षांपूर्वी तिची शशिपाल आणि दिगंबर या दोघांशी ओळख झाली होती. या दोघांनी तिला कांजूरमार्ग येथील कर्वेनगरात असलेल्या एमएमआरडीएच्या प्रोजेक्टमध्ये स्वस्तात एका फ्लॅटसह व्यावसायिक गाळा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून तिने त्यांना सुमारे २५ लाख रुपये दिले होते. ही रक्कम घेतल्यानंतर काही शासकीय कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या होत्या. त्यात तिच्या नावावर एका फ्लॅटसह व्यावसायिक गाळा देण्याचा करार करण्यात आला होता. त्याची झेरॉक्स प्रत तिला देण्यात आली होती. त्यांच्यातील हा संपूर्ण व्यवहार जोगेश्‍वरीतील जोगेश्‍वरीतील एस. व्ही रोड, जयस्वाल चेंबरच्या त्यांच्या कार्यालयात झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत या दोघांनी तिला फ्लॅटसह व्यावसायिक गाळ्याचा ताबा दिला नव्हता. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही तिला टाळत होते. नंतर त्यांनी तिला प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यामुळे तिने त्यांच्याकडे तिच्या पैशांची मागणी केली होती. मात्र तिला पैसे न देता ते दोघेही पळून गेले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच तिने आंबोली पोलिसात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शशिपाल जाधव आणि दिगंबर लोणे यांच्याविरुद्ध बोगस शासकीय दस्तावेज बनवून फ्लॅटसह व्यावसायिक गाळ्यासाठी सुमारे २५ लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या पाच महिन्यांत पळून गेलेल्या शशिपाल जाधव याला पोलिसांनी अटक केली. दिगंबर लोणे हा अद्याप फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेत आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत