मुंबई

डॉक्टरची २५ लाखांची फसवणूक; आरोपीस अटक

या गाळ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी तो गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी चौधरी कुटुंबियांना २५ लाख रुपये दिले होते.

नवशक्ती Web Desk

मुंबई : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीची सुमारे २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इसाक रियाज चौधरी असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत त्याच्यासोबत त्याचे रियाज अहमद वली मोहम्मद चौधरी व भाऊ मोहम्मद इम्तियाज रियाज चौधरी या दोघांना सहआरोपी करण्यात आले होते. या दोघांच्या अटकेनंतर मोहम्मद इसाक हा पळून गेला होता. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. चौधरी कुटुंबीयांचा साकिनाका परिसरात एक गाळा होता. या गाळ्याची विक्री करायची असल्याने त्यांनी काही एजंटला सांगितले होते. मोहम्मद इरफान मोहम्मद कासिम पाशा या डॉक्टरला त्यांच्या क्लिनिकसाठी एका गाळ्याची गरज होती. त्यामुळे या गाळ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी तो गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी चौधरी कुटुंबियांना २५ लाख रुपये दिले होते.

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम