मुंबई

६५० पैकी २५ टक्के घोड्यांचे तबेले हटवणार; पुनर्वसनासाठी BMC रॉयल क्लबला १०० कोटी देणार

Swapnil S

मुंबई : रेसकोर्सची १२० एकर जागा नुकतीच महापालिकेच्या ताब्यात आली. पण, मुंबई सेंट्रल पार्कसाठी बाधित होणार्‍या ६५० पैकी २५ टक्के तबेल्यांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून रॉयल क्लबला १०० कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले जाणार आहेत. पालिकेने रॉयल क्लबला अशी आर्थिक भरपाई देण्यास नागरिकांचा विरोध आहे.

रेसकोर्स येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने ९२.६१ एकर जागेच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण केले आहे. क्लबने नव्या दरानुसार १.२७ कोटींचे भाडे पालिकेकडे भरले आहे. या ठिकाणी १२०.२० एकर जागेवर नागरिकांसाठी सर्वसुविधांनी युक्त मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. मात्र पालिकेच्या ताब्यात दिलेल्या जागेमधील ६५० पैकी सुमारे १६० तबेले बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी पालिकेने १०० कोटी रुपये द्यावेत अशी मागणी क्लबकडून करण्यात आली आहे. याला पालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत १०० कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. लवकरच ही रक्कम रॉयल क्लबला देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

झोपड्यांचेही पुनर्वसन

पालिकेच्या ताब्यात आलेल्या भूखंडाजवळ ४२५ झोपड्या आहेत. मुंबई सेंट्रल पार्क बनवताना त्या हटविल्या जातील. त्यांना झोपू योजनेतून पर्यायी घरे देण्यात येणार असल्याच माहिती पालिकेकडून देण्यात आली. यासाठी सल्लागार नेमला जाईल.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत