मुंबई

पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रे

या मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट वापरण्यात येतील

प्रतिनिधी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीचा उत्साह ओसरला आहे, मात्र शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार असल्यामुळे निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रे असणार आहेत.

या मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट वापरण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पोटनिवडणुकीदरम्यान कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे करण्यासाठी सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षा दलाच्या व कडेकोट बंदोबस्तात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीत ठेवण्यात आली आहेत. ३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती