मुंबई

रस्त्यांवरील चर बुजवण्यासाठी पालिका खर्चणार२८० कोटी

या पार्श्‍वभूमीवर खोदण्यात आलेले चर बुजवण्यासाठी मुंबई पालिकेच्या हद्दीतील सात परिमंडळनिहाय निविदा मागवण्यात आल्या आहेत

नवशक्ती Web Desk

मुंबई : केबल टाकणे, जल वाहिन्या टाकणे अशा विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदण्यात आलेले चर बुजवण्याचे मुंबई महापालिका हाती घेणार आहे. शहर व दोन्ही उपनगरातील चर बुजवण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल २८० कोटी रुपये खर्च करणार असून, कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरू असून, विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्याखाली केबल टाकणे, मोबाईलचे केबल नेटवर्कचे जाळे विस्तारणे, जल वाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे यासाठी चर खोदले जातात. खासगी कंपन्या आणि सरकारी यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या या कामांसाठी पालिका संबंधितांकडून पैसे आकारते. कामानंतर रस्त्यावर चर तसेच मोकळे ठेवले जात असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. विशेषत: पावसाळ्याच्या तोंडावर केल्या जाणाऱ्या कामांमुळे पाणी साचण्याचे प्रकार घडतात.

या पार्श्‍वभूमीवर खोदण्यात आलेले चर बुजवण्यासाठी मुंबई पालिकेच्या हद्दीतील सात परिमंडळनिहाय निविदा मागवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी या कामासाठी प्रशासकीय अधिकारात आयुक्तांनी ३८३ कोटींच्या कंत्राटास मंजुरी दिली होती. रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून यंदा परिमंडळनिहाय प्रत्येकी ४० कोटी असे एकूण २८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एक वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

या विभागांमध्ये बुजवणार चर

(प्रत्येक परिमंडळासाठी ४० कोटी)

परिमंडळ १ : ए/ कुलाबा, बी/सँडहर्स्ट रोड, सी/चंदनवाडी, डी/ग्रँट रोड, ई/भायखळा

परिमंडळ २ : परळ/ एफ दक्षिण, माटुंगा/एफ उत्‍तर, वरळी/जी दक्षिण, दादर/जी उत्‍तर

परिमंडळ ३ : वांद्रे/ एच पूर्व, वांद्रे/ एच पश्चिम, अंधेरी/के पूर्व

परिमंडळ ४ : अंधेरी/के पश्चिम, गोरेगाव/पी दक्षिण, मालाड/ पी उत्तर

परिमंडळ ५ : कुर्ला/ एल, चेंबूर/एम पूर्व, चेंबूर/ एम पश्चिम

परिमंडळ ६ : घाटकोपर /एन, भांडुप/, एस मुलुंड टी

परिमंडळ ७ : कांदिवली/आर दक्षिण, बोरिवली/आर उत्तर, दहिसर/आर मध्‍य

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?