मुंबई

प्रकल्प बाधितांना ७४ हजार घरांची गरज ३,०९१ नवीन पुनर्वसन सदनिका बांधल्या

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरू असून, प्रकल्प बाधितांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्राधिकरणांकडून फक्त २,११३ पुनर्वसन सदनिका प्राप्त झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेचे स्वतःचे भूखंड विकसित करुन ३,०९१ नवीन पुनर्वसन सदनिका बांधण्यात आल्या आहेत. परंतु ३५,००० पुनर्वसन सदनिकांची गरज होती. सन २०२३ मध्ये यामध्ये वाढ होवून ती तब्बल ७४,७५२ निवासी सदनिकांपर्यंत वाढल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

३०० चौरस फुटाच्या सदनिका

मुंबईत सुविधा व पायाभूत सुविधांसाठी त्याचप्रमाणे विकास आराखडा अंमलबजावणीसाठी पालिका विविध प्रकल्प राबवते. प्रकल्प उभारताना त्यामध्ये बाधित होणाऱया व्यक्तिंचे स्थलांतर हा पुनर्वसन प्रक्रियेचा भाग असून, त्यांना ३०० चौरस फूट चटई क्षेत्राची सदनिका देण्यात येत आहेत.

सन २०१९ मध्ये पालिकेला ३५,००० पुनर्वसन सदनिकांची गरज होती. सन २०२३ मध्ये यामध्ये वाढ होवून ती तब्बल ७४,७५२ निवासी सदनिकांपर्यंत वाढली. सध्या उपलब्ध असणारे स्रोत हे पुनर्वसन सदनिका निर्माण करण्यासाठी अपुरे ठरत असल्याने आणि वाढलेली प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी जमीन मालक/विकासक यांना सहभागी करुन, त्यांच्या मालकीच्या भूखंडावर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या तरतुदीनुसार विनियम ३३.१० चे कलम ३.११ अंतर्गत पुनर्वसन सदनिका बांधण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस